कमल यादव – प्रतिनिधी

 

कामठीत जीवन रक्षकचे कार्यकर्त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांचे हस्ते  साहित्य वाटप करण्यात आले.

नायब तहसिलदार — अमर हांडा यांच्या प्रमुख उपस्थितीत.

आगामी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन व अन्य धार्मिक उत्सव निमित्ताने पोहण्यात पारंगत असलेले भोई समाज बांधव मागील अनेक वर्षापासून पोलीस विभागाला सहकार्य करीत आले आहे. आम्ही शासनाने ठरविल्या नुसार योग्य ते सहकार्य करण्याचे व कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कामठी नवीन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी आयोजित कामठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जीवन रक्षक दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित स्वयंसेवकांना ओळखपत्र व टी शर्ट वाटप करण्यात आले. याप्रसंगी नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना संभाषण केले.

भारतीय भोई विकास मंडळ नागपूर संलग्नित जीवन रक्षक दल च्या माध्यमातून ५ सप्टेंबरला कामठी तहसील कार्यालय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचका वर एड. दादासाहेब वलथरे,मुख्य अतिथी नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, नायब तहसीलदार अमर हांडा,कामठी तालुका मराठी पत्रकार संघाचा अधयक्ष नंदू कोल्हे,भारतीय भोई विकास मंडळाचे उपाधेक्ष मनोहर भोयर,एड. सुजाता वाळवेकर,एड. प्रांजली हुक्ररे,जयघोष वालबेकर, पिपरी (कन्हान ) शाखा अधयक्ष विजय केवट, गादा (नेरी ) शाखा अधेक्ष अंबादास भोयर,बिना (संगम ) शाखा अधेयक्ष सचिन शेंडे,कोमल देवगडे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे हस्ते जीवन रक्षक दल च्या स्वयंसेवकाना ओळखपत्र, टी शर्ट वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन जीवन रक्षक दल संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम तर प्रास्ताविक एड दादासाहेब वलथरे यांनी केले. या कार्यक्रमाला पिपरी कन्हान, गादा नेरी,बिना संगम,भंडारा येथील मोठ्या संख्येने जीवन रक्षक दल चे स्वयंसेवक उपस्थित होते तर आभार दिलिप मेश्राम यांनी मानले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com