सुनील नंदनवार
शहर प्रतिनिधी
दखल न्युज भारत, आरमोरी
शिक्षकदिनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण.
आरमोरी येथिल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले सेवानिवृत्त प्राचार्य, डॉ.के.टी.किरणापुरे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वाटप करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी किरणापुरे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून देताना म्हंटले की, स्वतःपेक्षा आपल्या कामाला श्रेष्ठत्व द्यावे हे सांगण्यासाठीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वतोपरी कार्य करावे असे प्रतिपादन किररणापुरे यांनी केले. यावेळी अधयक्षस्थानी आरमोरी येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील उपमुख्याध्यापिका माया हेमके, प्रा. डॉ. के. टी. किरणापूरे ,पर्यवेक्षक पराग गुंफावार, किशोर सहारे, हेमंत निखारे, सुनील चट्टे, रश्मी लोखंडे, प्रियंका डोगरवार, प्रिती धाईत, पंकज चांभारे, उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतातून गुरूचे महत्व विषद करताना कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार करीत असतो त्याच प्रकारे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला योग्य वळण देत असतो असे मनोगत विध्यार्थीनी प्रगट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
चेतन हजारे तर आभार सुषमा भांडारकर, यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.