सुनील नंदनवार

 शहर प्रतिनिधी

 दखल न्युज भारत

आरमोरी :-

स्थानिक महात्मा गांधी कला विज्ञान व स्व. न.प. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि महिला विकास व सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट 2022 ला सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर तपासणी शिबिरासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथील प्रशिक्षित चमुला पाचारीत करण्यात आले होते. यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सिकलसेल, एच. आय. व्ही., रक्तगट, एच. बी. इत्यादी तपासण्या करून शिबिराचा लाभ घेतला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास व सुरक्षा समिती प्रमुख प्रा. सुनंदा कुमरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. कविता खोब्रागडे, डॉ. सीमा नागदेवे, प्रा. स्नेहा मोहूर्ले, प्रा. विभावरी नखाते तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com