प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

 

        नागपूर येथे पिबी फिटनेस नागपूर आणि वूमेन एम्पॉवरमेंट असोसिएशन नेटवर्क यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिस इंडिया फिटनेस २०२२ या कार्यक्रमात पूर्ण देशभरातून २४ प्रोफेशनल फिटनेस मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या दिनांक २ ते ४ सप्टेंबर या ३ दिवसाच्या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला, एका पेक्षा एक मॉडेल्स असल्या मुळे कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहचली असताना चंद्रपूर नगरातील शिवानी विलासराव रामटेके (वय २३) या मॉडेल ने मिस फ्लेक्सीबल पुरस्कार मिळवून चंद्रपूर शहराचे नाव उंचावले. शिवानी ने या कार्यक्रमासाठी मागील ६ महिने अथक परिश्रम घेऊन ११ किलो वजन कमी करून कार्यक्रमात आपले स्थान पक्के करून Trophy वर शिक्कमोर्तब करण्याचे ठरवले होते पुढे बोलतांना तिने महिलांनी आपल्या fitness आणि health विशेष लक्ष द्यायला हवे असे सांगितले आपल्या विजयाचे श्रेय आई अल्का रामटेके, वडील विलास रामटेके, फिटनेस ट्रेनर श्रवण अरविंद परचाके यांना दिले. या कार्यक्रमात Brand Ambassador म्हणून Asian Body Building Winner आणि Sport Physique 2016 Bhutan,Bronze Medlist Winner सोनाली स्वामी हिने कार्यभार सांभाळला होता.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News