जनसामान्यांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचविणाऱ्या रोहन आदेवार यांचा आज वाढदिवस….  — त्यानिमित्ताने,”दखल न्यूज भारत द्वारा,दोन शब्द..

     मारेगाव तालुक्यातील टाकळी(कुंभा) या गावातील रोहन राजेश आदेवार या युवकाने आपल्या तालुक्यासह काही भागात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. 

        जनहितार्थ व शेतकरी हितार्थ वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ते नेहमी सोशल मीडिया व बातम्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. 

         रोहन आदेवार लोकमान्य टिळक महाविद्यालय मध्ये शिकत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली.

    त्यानंतर त्यानी वेगवेगळ्या चॅनलमध्ये,वृत्तपत्रात,आणि अनेक सामाजिक संघटनेत काम केले असून बऱ्याच जनसामान्यांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

       याचबरोबर राजकारण्यांचे निवडणुकी दरम्यान काम सुद्धा यशस्वीपणे पूर्ण केले आहे.आता वर्धा येथे समाजकार्य व स्पर्धा परीक्षेचे शिक्षण सुरू असून सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपली चांगली पकड निर्माण केली आहे.रोहनच्या कामगिरी बद्दल त्याला विविध प्रकारचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे.

       रोहन आदेवार यांच्यामध्ये असलेली संवेदनशीलता व जागरुकता अनेक नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ सार्थकी ठरली आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयोगात आली आहे.

        रोहन आदेवार हे,”दखल न्यूज भारतचे,यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी असून वर्धा जिल्ह्याचे साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी आहेत.

         त्यांचा शांत व समयसुचक स्वभाव हा प्रभावी व परिणामकारक असल्याने ते नेहमी लोक नजरेत खेळत असतात.

            अन्यायाविरुद्ध व शोषणाविरुद्ध लढा देणे हा त्यांचा महत्त्वपूर्ण गुणधर्म असल्याने ते नेहमी आपल्या कार्याच्या माध्यमातून बोलत असतात.

           आपल्या प्रेमळ व दयाळू स्वभावातंर्गत जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रोहन आदेवार हे भविष्यात अनेकांचे प्रेरणास्रोत व आधारस्तंभ बनावेत असी सदिच्छा हजारो मित्रांची आहे.

        यामुळे,”त्यांच्या वाढदिवसानिमित्त,…हजारो मित्रांनी व आप्तपरिवारातील स्नेहींनी आणि,”दखल न्यूज भारतच्या,आदरणीय सहकाऱ्यांनी..‌

      “रोहनभाऊ आदेवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत!

       याचबरोबर ते सदैव सुखी-समाधानी-निरोगी-आनंदी रहावे हिच सर्वांकडून सदिच्छा व्यक्त होत आहे…

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷