युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील गत वैभव प्राप्त असलेले शेतकरी सहकारी जिनिंग अँड फॅक्टरी भाग भांडवलदाराच्या भांडवलामधून उभी करण्यात आलेली होती.
सदर जिनिंग काही कारण नसताना विकण्याचे कट कारस्थान आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी संचालक मंडळ करीत आहे सदर विक्री भाग भांडवलदारांच्या विनापरवानगी त्यांना माहिती नसताना विक्री करण्याचे कारस्थान संचालक मंडळ करीत आहे.
त्याकरिता दिनांक 8/ 8/ 2024 रोज गुरुवारला कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथील शेतकरी भवन येथे जाहीर लिलाव करणार असून या आधी सुद्धा सदर मिळकती लगत असलेली जागा अध्यक्ष नसतांना यांनी विक्री केलेली आहे.
सदर मिळकत कवडीमोल भावात त्यांनी विक्री केली आहे. सदर मिळकत कशासाठी विक्री केली व ती रक्कम कुठे खर्च केली याचा सुद्धा पत्ता लागलेला नाही.
सदर मिळकतीतुन आलेली रक्कम संस्थेच्या खात्यात आज रोजी शिल्कक सुद्धा सदर विक्री मधून मिळाले.
खात्यात आज रोजी शिल्लक सुद्धा नाही.सदर विक्रीतून मिळालेले पैसे संस्थेकडे नाही तर ते पैसे गेले कुठे ? या नवीन संचालक मंडळावर जनतेने फार मोठा विश्वास दाखवून निवडून दिले तेच संचालक मंडळ सदर मिळकत विक्री करून दर्यापूर तालुक्यातील गत वैभव प्राप्त असलेले शेतकरी जिनिंग इतिहासात जमा करण्याचे काम करीत आहेत.
याचा जाब दर्यापूर तालुक्यातील सर्व जनतेने यांना विचारायला हवा.शेतकरी जिंगची शेवटची मिलकट असून या व्यतिरिकत कोणतेही मिळकत नाही.
सदर जिनिग् विक्रीचा लिलाव केल्यास सदर लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेचे ता.अध्यक्ष मनोज तायडे यांनी घेतलेली आहे.
या आधी सदर जागे लगत असलेली लेआऊट विक्री केले. त्याची सुद्धा चौकशी व्हावी असे निवेदन त्यांनी दिलेले आहे.