ब्रेकिंग न्यूज… — शेतात पलटली बस! प्रवासी थक्क!… — अन् थरारक वास्तव..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

     जागोजागी रस्त्यांची कामे सुरु असल्यामुळे कुठल्याही वाहनाने प्रवास करणे सध्यातरी अवघड झाले आहे.

        पावसाच्या दिवसात तर अशा खराब रस्त्याने प्रवास करणे लयच जिकिरीचे झाले आहे!

         याचबरोबर खड्डेमय व निमुळती मार्गाने एस‌.टी.बस धावने म्हणजे बस चालकांचे जिवघेणे थरारक अनुभवच असणार!

          असाच थरारक अनुभव व प्रसंग आज अनुभवास आलाय तो चिमूर बस आगाराच्या एस.टी.बस.पलटीचा!..तळोधी (बा.) ला प्रवासी घेऊन जाणारी बस तर चक्क तलावा जवळील शेतात पलटली आणि सर्व प्रवाशांसह चालक – वाहकांच्या झातीचे ठोके वेगाने धडधडू लागले.

          सुदैवाने जिवितहानी टळली,अन…बस पलटीचा थरार प्रवासांच्या डोळ्यात वेगाने घुमू लागलाय,दिसू लागलाय..

          चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर एस.टी.आगाराची,एम.एच.४०,वाय.५२६७ क्रमांकाची बस चिमूर – नेरी – सोनापूर – येणोली मार्गे तळोधी (बा.) पर्यंत धावणार होती.

     मात्र,रस्ता खराब असल्यामुळे नागभिड तालुकातंर्गत येत असलेल्या सोनापूर ते येणोली (माल) च्या मधोमध सदर बस शेतात पलटी झाली.सुदैवाने प्रवास करणारे सर्व प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बस मध्ये 13 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.