अकोट प्रतिनिधी

समाजात वावरतांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीशी आपला संबंध येतो त्या व्यक्तीच्या संपर्काने मनुष्य स्वभावाचे विविध दर्शन आपणास घडते, अनेक अनुभवी पाठीशी पडतात आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना प्रवासातील प्रसंग शाळेतील विविध समारंभ इत्यादींनी अनुभवची आपल्याला माहिती होते.हे ब्रिद वाक्य लक्षात ठेवून मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अजनगांव परिक्षेत्र वन महोत्सव १/७/२०२२ ते ७/७/२०२२पर्यंत चा कार्यक्रमाचा सामारोप करण्याकरीता महाराष्ट्र तील चांदापासून तर बांधापर्यंत समाजप्रबोधन म्हणून आदरणीय सत्यपाल महाराज चिंचोळकर यांचे प्रामुख्याने नाव घेण्यात येते ते सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर महाराजानी हातात झाडू घेइन अनेक गांवे स्वच्छता करून आणि हातात खंजिरी घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता निर्माण केली ,आणि आज मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंजनगाव परिक्षेत्र अंतर्गत दिनांक १ जुलै २०२२ते ७ जुलै या कालावधीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. त्या व वन महोत्सावाचा समारोप त्यांच्या हातून व्हावं हा भाग्याचा क्षण अंजनगाव परिक्षेत्र कर्मचाऱ्यांना लाभला आणि आज अंजनगाव परिसरातील वन महोत्सव ची सांगता झाली, वन महोत्सव कार्यक्रमांमध्ये अकोट आगारांमध्ये अध्यक्ष भाषणावरून त्यांनी वन विभागाचे खरे कौतुक केले, की त्यांनी सांगितलं की वनविभाग आहेत तर आपण आहोत वन विभागामध्ये जे कर्मचारी रातन दिवस काम करतात त्यांच्या कार्याला मी सलाम करतो मी संपूर्ण आयुष्यभर समाज प्रबोधन करत असताना वृक्ष किती महत्त्व आहे. त्यांचे त्यांनी अनेक उदाहरणे दिले.व त्या नंतर आकोट विभागाचे पोलीस स्टेशन अधिकारी नितीन देशमुख पोलीस अधिकारी अकोट ग्रामीण यांनी सुद्धा अकोट वन विभाग अंजनगाव परिक्षेत्र मध्ये जे वृक्षारोपण कार्यक्रमाची समारोप होत आहे. या समारोप कार्यक्रमाला मला बोलावून मी धन्य झालो कारण की माझ्या हातून सुद्धा वृक्ष लागवड होत आहे. वनखाते समाजामध्ये जरी वावरत नसेल तर तरी त्यांचे कार्य महान आहे,अशी त्यांनी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केल्या,कार्यक्रमाला आकोट नगरपरिषद तील महिला नगर सदस्य सौ.कल्पना घावट हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून लाभले होत्या, त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्याच पद्धतीने नगरपरिषद सदस्य पटके सर हीसुद्धा कार्यक्रमाला प्रमुख लाभले यांच्या हातून सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले, अजनगांव परिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी सुद्धा आपले प्रास्ताविक मधे मेळघाट प्रादेशिक विभाग राबवित असलेले वन महोत्सव बाबत सविस्तर माहिती दिली, त्यांनी आपल्या प्रास्ताविकामधे मा. उप वनसंरक्षक मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा श्रीमान गिन्नी सिंग मॅडम यांनी वन महोत्सव मधे जास्त जास्त वृक्ष लागवड कसे होवून संवर्धन व संरक्षण यांबाबत योग्य मागदर्शन करीत आहेत.तसेच या विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प-हाड साहेब यांनी स्वःता वृक्ष दिंडी मधे कुंटूबा सह सहभाग नोंदवून वन महोत्सव १/७/२०२२ ते ७/७/२०२२ या कालावधी मधे साजरा करण्या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले . तसेच महत्त्वाचं म्हणजे माजी सैनिक म्हणून चिंचोळकर आताचे वनरक्षक मेळघाट बीट यांची मुली नामे कुमारी दिव्या चिंचोळकर यांनी बारावी मध्ये ९१% नी उत्तीर्ण झाली,त्या अनुषंगाने तिचा पण सत्यपाल महाराज यांच्या हस्ते वनमहोत्सव दरम्यान आकोट आगार मधे वृक्ष लागवड झाल्यावर सत्कार करण्यात आला. वनमहोत्सावाला प्रचंडपणे प्रतिसाद मिळाला आमंत्रित पाहुण्यांना मान्यवरांचे चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता केली,

या कार्यक्रमात वनापाल पोपटखेड वनपाल पांढरा खडक वनपाल दहिगाव सर्व स्टॉप सह हजर होते.

 

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com