नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : या पावसाळ्यात तात्काळ साकोली शहरात रोगप्रतिकारक फवारणी करा व लहान बालकांना विविध आजारांनी घेरण्यापूर्वी वेळीच बंदोबस्त करा या आशयाचे निवेदन आज ०७ जुलैला नगरपरिषद साकोली मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांना फ्रिडम युथ फेडरेशनचे अध्यक्ष किशोर बावणे व सहका-यांनी स्वाक्षरीसह दिले.
पावसाळ्यात शहरातील प्रभागांमधील नाल्या, गडारे, डबके यांत डास किडे जंतूंची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे याने लहान बालक व विद्यार्थी यांना डेंगू मलेरिया हिवताप यासारखे प्रभागातील नाल्या, सांडपाणी गडारे, शासकीय निमशासकीय जि. प. प्राथमिक शाळा परीसरातील सार्वजनिक स्थळांवर जंतूनाशक मशीनने फवारणी करावी व रोगांवर नियंत्रण मिळविण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देतेवेळी फ्रिडमचे किशोर बावणे, स्वप्निल गजभिये, असित बडोले, मयूर सोनवाने, गोविंद वानखेडे, प्रशांत भलावी, सचिन कुंभरे, रवि मेश्राम, अश्वेश खांडेकर, साहिल विनधानी, बबन हेमणे, रोशन मारवाडे व अन्य सहकारी हजर होते.