धानोरा/भाविक करमनकर          

 

ब्रह्मपुरी आगाराची धानोरा- रांगी- आरमोरी -ब्रम्हपुरी या मार्गाने नियमित बस सुरू करण्याची मागणी रांगी परिसरातील लोकांनी आणि शालेय शिक्षणाच्या पालकांनी केली आहे .        

एस.टी .महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप काळापासून म्हणजे गेल्या ८ते१० महिन्यापासून बस बंद करण्यात आल्या आहेत. मात्र इतक्या महिन्याचा कालखंड उलटूनही बसची सेवा सुरु करण्यात न झाल्याने धानोरा मोहलि, रांगी आरमोरी परिसरातील नागरिकांना आरमोरी येथे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.तर मोहलि येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी हिच बस महत्त्वाची होती. तरी सदर बस पूर्ववत सुरू करुन विद्यार्थ्यांची , नागरिकांची होरपळ थांबविन्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी केली आहे.

 सदर बस सकाळी 8.30वाजता ब्रम्हपुरी येथून सुटायची 10.00ला रांगीला यायची ,रांगी वरुण याच बसने अनेक मुलेमुली मोहलि व धानोरा येथे शिक्षण घेण्यासाठी जायचे परत 4.30वाजता यायचे पण बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.वांरंवार मागणी करुनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे.

 धानोरा मोहलि रांगी परिसरातील नागरिकां याच मार्गाने येजा करण्यासाठी कोणतेही साधन नाही.व प्रवासाची वाहन चालत नसल्याने नागरिकांची मोठी होरपळ होत आहे.

 गेल्या आठ महिन्यापासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सेवा बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपा पूर्वी ही बस ब्रह्मपुरी येथून सकाळी 8.30 वाजता सुटत होते दिवसभराच्या आपल्या नियमित दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती या बसमुळे आरमोरी ब्रह्मपुरी वैरागड रंगीत धानोरा येथील नागरिक व्यापारी शेतकरी विद्यार्थी कर्मचारी रुग्ण आदींना धानोरा आरमोरी ब्रह्मपुरी तालुका मुख्यालय याठिकाणी जाण्याकरता अत्यंत सोयीची होती परंतु सध्या बस ,बंदच असल्याने लोकांची, विद्यार्थ्यांची , कर्मचाऱ्यांची , व्यापारी व रुग्णांचे वाहना अभावी हाल होत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com