वणी : परशुराम पोटे

 

       स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित आणि लोकमान्य टिळक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

     या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे , डॉ.शरद जावळे ,संजय देरकर, विद्याताई शितोळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तथा विविध बारा संस्थांचे रोजगार अधिकारी उपस्थित होते.

      प्रास्ताविक करतांना प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नेमक्या संधीचा लाभ होऊन त्यांच्या शिक्षणाची रोजगारात परिवर्तन होण्यासाठी हा उपक्रम असल्याचे अधोरेखित केले.

       खासदार बाळू धानोरकर यांनी गुणवत्तेच्या आधारे स्वतःला सिद्ध करण्याची निर्णय क्षमता आपल्याजवळ असायला हवी असे म्हणत नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असे आवाहन केले.

     आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी महाविद्यालयात केवळ शब्दांचे अर्थ मिळतात जीवनाचा खरा अर्थ व्यवहारात स्वतः शोधावा लागतो असे म्हणत आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या नवनवीन संधींना समजून घेऊन आचरणात नैतिकता पाळत आपला आदर्श स्थापित करावा असे मार्गदर्शन केले.

    जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आयुष्यात ध्येय निश्चित करा. कष्ट आणि जिद्दी शिवाय यश नाही असे सांगत आपल्यातील न्यूनगंड आणि मर्यादांची बंधने झुगारण्याची ही संधी आहे असे मत व्यक्त केले.

      विद्या शितोळे यांनी या उपक्रमाकडे स्वतःतील गुणवत्तेला सिद्ध करण्याची संधी म्हणून पहावे असे आवाहन केले.

     टिकाराम कोंगरे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती नोकरीवर असावी यासाठी हा प्रयास असल्याचे मत व्यक्त केले.

      अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा यांनी केवळ नोकरीच नव्हे तर व्यवसायाच्या दृष्टीनेही आपण विचार करणे अत्यावश्यक आहे यावर भर दिला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पावडे यांनी केले. यावेळी पुणे,औरंगाबाद इत्यादी स्थानावरून आलेल्या विविध संस्थांनी सुमारे साडेचारशे च्या वर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या हे विशेष उल्लेखनीय.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com