डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी तालुक्यांतील पेठा येते माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,गांवात माता मंदिर होता.मात्र लाकडा पासून तयार केले होते,प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चाना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात.मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने येतील सर्व समाज बांधवांनी गांवात चर्चा करून माता मंदिर बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष यांनी शासनाकडून माता मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही.मात्र माझ्या स्वतःकडून आर्थिक देणगी देतो असे बोलून माता मंदिर साठी आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,नरेश गरगाम,राकेश सड़मेक,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,माधव कूड़मेथे,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,व पेठा येतिल गावकरी अनिल मूलकरी,वसंत मूलकरी,सत्यम वेलादी,रामदास मूलकरी,सुधाकर कलकोटवारसह आविसं तथा अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.