युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अमरावती जि. प. मधिल सेवानिवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागणीसाठी दिनांक 6 मेला मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अमरावती यांच्या दालनात मोठ्या संख्येने एकत्रित आले होते.
सेवा निवृत्त शिक्षकांना अद्याप पर्यंत सातव्या वेतन आयोगाचे हप्ते न मिळाल्या बाबत लेखी निवेदन देण्यात आले. या मागणी सह अनेक सेवा सेवा निवृत्त शिक्षकांना अद्याप पर्यंत गात विमा योजनेचा लाभ रक्कम मिळाला नाही.
अनेक सेवा निवृत्त शिक्षकांना सेवा निवृत्ती नंतर जी पी एफ रक्कम मिळाली नाही.अनेक सेवा निवृत्त शिक्षक जे 30 जून रोजी सेवा निवृत्त झालेत त्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतन वाढ फरक रक्कम मिळाली नाही.
अश्या अनेक प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी जिल्ह्यातील सेवा निवृत्त शिक्षकांनी केली आहे. जिल्ह्यातील सेवा निवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी सत्येंदु अभ्यंकर ,अध्यक्ष , चेतवा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या सह श्याम पाटील , दिपक मुळे, वासुदेव रेचे, राजू खारकर , संजय वानखडे , प्रशांत गुल्हाने, दिलीप चौधरी सर,अनिल ढोके ,प्रभाकर देशमुख,गजानन व्यवहारे ,इकबाल अहमद एजाज अहमद, मो.शकील अ. रहेमान, मारोती फुटाणे, विनोद कुऱ्हेकर,पुंडलिक वितोंडे, हिरालाल मकेश्वेर,सुरेंद्र वाडेकर, अरविंद महल्ले, सविता चर्जन, शिला उल्हे,नलिनी लंगडे , अब्दुल सदील अब्दुल सत्तार ,मनोहर चर्जन, अहमद उल्लाह खान, दिनेश कनेरकर , धनराज राऊत, प्रकाश डोंगरे, जावेद अहमद खान, रणजित नितनवरे, सुनंदा गोहत्रे ,मसूद अहमद शे.नजीर,मोहन धर्माळे व जिल्ह्यातील इतर अनेक सेवा निवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करणे साठी उपस्थित होते.