राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधि
छत्तीसगढ़ राज्यातून पोहा लादत आंध्र प्रदेश राज्याकडे जाणारा मोठा १६ चाकी ट्रक सावलखेडा जवळ टिकले यांचा शेतासमोर चालकाचे नियंत्रण सूटल्याने रस्त्याचा मधोमध पलटला.त्यामूळे या मार्गाची वाहतूक खोळंबत कोंडी निर्माण झाली आहे.
तालूक्यातून गोठणगांव फाटा ते कढोली वैरागड व पूढे गडचिरोली मार्गे ही अंतरराज्यीय जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सूरू असते. आज पोहा लादत या मार्गाने चाललेला ट्रक अनियंत्रित होत रस्त्यावर पलटला व रस्त्यावर पूर्ण पणे आडवा झाल्याने वाहतूक बंद पडत रस्त्याचा दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली आहेत.
यावेळी सूदैवाने मात्र कोणतीच जिवितहानी झाली नाही.ट्रकचे चालक व क्लिनर सूरक्षित आहे ट्रक क्षतिग्रस्त झालेला आहे.त्याला बाजूला करीत वाहतूक सूरळीत करण्याचे प्रयत्न सूरू होते.अद्याप पर्यंत रस्ता सुरळीतपणे सुरु झालेला नाही.