एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हा प्रशिध्दी प्रमुख पदी सौ.सुनीता राजू इंगळे यांची नियुक्ती…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

           एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.श्री.पांडूरंग नरवडे व राष्ट्रीय महासचिव आ.बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात संघटनेची बांधणी सुरू आहे.

      याच कार्याचा एक भाग म्हणून एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हा प्रशिध्दी प्रमुख पदी आ.सुनिता राजू इंगळे यांची नियुक्ती,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केली आहे.

         त्यांच्या नावाची शिफारस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आ.मध्यमा मनिष सवाई यांनी केली होती.

           आ.सुनीता राजू इंगळे या उत्तम व वैचारिक व्यक्तीमत्व असून त्यांनी आपल्या अनेक कार्यातंर्गत समाजहिताला प्राधान्य दिले आहे.त्या आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा संघटन प्रमुखांना आहे.