
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.श्री.पांडूरंग नरवडे व राष्ट्रीय महासचिव आ.बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात संघटनेची बांधणी सुरू आहे.
याच कार्याचा एक भाग म्हणून एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हा संघटकपदी आ.अमन मनीष सवाई यांची नियुक्ती,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केली आहे.
त्यांच्या नावाची शिफारस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आ.मध्यमा मनिष सवाई यांनी केली होती.
कुमार अमन मनीष सवाई एक उमदा नेतृत्व असून, ध्येयनिष्ठ तथा कर्तृत्ववान गुणांची झाल्लर त्यांच्या अंगी आहे.त्यांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची ओढ असल्याने ते एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून स्वत:ला अनुभवणार आहेत.ते आपल्या पदातंर्गत संघटनेच्या बांधणी संबंधाने सदैव संवेदनशील असतील अशी अपेक्षा आहे.