छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री.साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे एकूण 28 सायकलीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. पी आर आकरे सर ,प्राचार्य जीभकाटे सर , पालक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मानव विकास मिशन अंतर्गत दरवर्षी मुलींना सायकली मोफत दिल्या जातात. यामुळे बाहेर गावून येणे जाणे करणाऱ्या मुलींना शाळेमध्ये येणे जाणे अतिशय सुक्कर होते. याचा फायदा दरवर्षी मुलींना मिळत असतो. मालेवाडा परिसरात जवळपास 20 ते 25 गावातील विद्यार्थी जाणे येणे करतात. मानव विकास मिशनच्या या उपक्रमामुळे बाहेरगावच्या मुलींना शालेय शिक्षण घेणे सोयीस्कर होते.