वृक्ष,वने,पशु,पक्षी,प्राणी संपुर्ण निसर्ग हीच खरी संपत्ती असल्याने वाईल्ड एनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हानच्या सर्व सभासदांनी प्राणी मात्रावर प्रेम करावे,- माजी खासदार प्रकाश जाधव…

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

कन्हान : – माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांनी वृक्ष, वने,पशु ,पक्षी,प्राणी आणि संपुर्ण निसर्ग हीच आपली खरी संपत्ती असल्याने या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व जोपसना करणे आपले आद्य कर्तव्यच आहे.

      अशा प्रकारचे महत्वपूर्ण मार्गदर्शन वाईल्ड एनिमल एॅण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना करतेवेळी प्राणीमात्रावर प्रेम करा, तेही आपल्याला प्रेम देतील असे मार्मिक सद्भावना माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांनी व्यक्त केल्यात. 

         रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे वाईल्ड एनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) संस्थेची बैठक माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.

        याप्रसंगी वृक्ष, वने, पशु , पक्षी, प्राणी आणि संपुर्ण निसर्ग हीच आपली खरी संपत्ती असुन आपणास जिवन जगताना पदोपदी लाभ होत असल्याने या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व जोपसना करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे.

        संस्थेच्या माध्यमातुन नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होऊ नये आणि प्राणी मात्रांचे संरक्षण करित पर्यावरणाचा समतोल राखण्यास समाजा मध्ये विविध माध्यमातुन जनजागृती करून संस्था सदस्यांनी नियमित अग्रेसर राहुन निसर्ग व प्राण्याची सेवा करित आपल्या हातुन सत्कर्म करावे असे मौलिक मार्गदर्शन माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांनी करून संस्थेच्या सदस्यांचे मनोबल वाढविले.

       या यथोचित मार्गदर्शना बद्दल प्रकाशभाऊ जाधव यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मनपुर्वक आभार व्यकत केले.

      कार्यक्रमास वाईल्ड एनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) अध्यक्ष सचिन सालवी, उपाध्यक्ष आशिष महल्ले, सचिव राम जामकर, सहसचिव अविनाश पासपलवार, कोषाध्यक्ष राजकुमार बावने व सदस्य- प्रीतम ठाकुर, उत्तम शरणागते, करण व्यवहारे, अक्षय नारावार, मनोज पासपलवार, वैभव लक्षणे, अनुज चवरे, चेतन ठवरे, रोहित शिंदे, कुणाल देऊळकर, मंगेश मानकर, रज्जत वाहाने, विशाल इंगळे, नितिन ईळपाते, प्रथमेश पगारे, नीलेश नेवारे, रहीम शेख, रोहित मलके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.