भाविक करमनकर
प्रतिनिधी धानोरा
दिनांक 6 मे 2023ला धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र जिल्हा परिषद केन्द्र शाळा दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव येथे राजश्री शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांची सामाजिक कामगिरी त्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अस्पृश्यांसाठी शाळा दवाखाने, पानवठे ,सार्वजनिक विहिरी निरनिराळ्या जाती धर्माच्या विद्यार्थीसाठी वस्तीगृहाची स्थापना केली. इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे असे आदेश त्यांनी आपल्या संथानात काढले, अशा समाजसुधारकाला विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर गावडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदलाल दुगा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रमेश बघेल सर तसेच विजय गावडे,महेश गावडे, शाळेतील शिपाई शशिकला बाई गावडे, कचोरा गावडे आणि माजी विद्यार्थी सपना मडावी, रितू नैताम, करीना मडावी. शाळेतील विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते