पारशिवनी तालुकातंर्गत कुमारी प्रेरणा धनराज मडावी ही आदिवासी समाजातून झाली पहिली डॉक्टर..  — २०२२ ला एम.बी.बी.एस.अंतर्गत वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण..

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:- पारशिवनी तालुकातंर्गत कुमारी प्रेरणा धनराज मडावी हीने २०२२ ला एम.बी.बी.एस.अंतर्गत वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करून प्रथम आदिवासी मुलगी डॉक्टर बनली व समाजासाठी ती प्रेरणादायी ठरेल अशा भावना समाज बांधवांकडून पुढे आल्या आहेत.

       कुमारी प्रेरणा धनराज मडावी या मुलीने २०१८ मध्ये निट परिक्षा उत्तीर्ण करून गोंदिया येथील के. टी. एस‌.वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व अभ्यासक्रम पुर्ण करूण २०२२ ला अंतीम वर्षाची परीक्षा यशस्वी करून उत्तीर्ण झाली.

       कुमारी प्रेरणा धनराज मडावी ही आदिवासी समाजाची मुलगी असुन त्या समाजातंर्गत तालुक्यातून प्रथम मुलगी ही डॉक्टर बनली असल्याने ती आता आपल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता आयडीयल व प्रेरणादायी ठरणार असल्याचे आई सौ. धनराज मडावी यांनी सांगितले.

        प्रेरणा डॉक्टर बनली यामुळे तिचे अभिनंदन राजे वासुदेव शहा टेकाम राष्ट्रीय उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी,हरिष उईके जिल्हा परिषद सदस्य,आकाश उईके,सौ.वर्षाताई कोकोडे.शिवप्रसाद कुंभरे.भालचंद्र भलावी.सौ. दुर्गावती सर्याम.विनोद पुरकाम.सुरेश भलावी.सरपंच कलिराम उईके,सरपंच प्रिती मिथुन उईके,सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांच्या सह तालुक्यातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.