धानोरा /भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेजवळ असलेले मुरुमगाव येथे हनुमानाचे भाविक भक्तानी हनुमान जयंती उत्साहात साजरी केली सर्वप्रथम सकाळी हनुमान मंदिरातील मूर्तीचे विधिवत पूजन करून श्री गुरुदेव भजन मंडळ मुरूम गाव च्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. भजनानंतर गोपाल काला करण्यात आले यानंतर गावामध्ये रॅली काढून विविध प्रकारे झाकी दाखविण्यात आले.
शेवटी हनुमान च्या मंदिरात सगळे भाविक भक्त जमा होऊन महाप्रसादाचे आस्वाद घेतले यामध्ये हनुमान सेवा संस्था समितीचे अध्यक्ष गणेश रामचंद्र बैरवार यांनी उपस्थित असलेल्या अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी , व गावातील समस्त नागरिकांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव प्रसाद गवर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूम गाव, अजमन रावटे माजी सभापती पंचायत समिती धानोरा. प्राध्यापक ओम देशमुख, मिंटू दत्त उत्तम विश्वास ,जितेंद्र संगोडीया, महेश सांगोडिया नरेश बैरवार रवी संगोडिया ,वसंत कोलियारा , जयराम संगोडिया गणेश कापगते ब्रिजलाल सोनी व गावातील महिला मंडळींनी सुद्धा सहकार्य केले तसेच हनुमान मंदिर समिती बाजार चौक मुरूमगाव येथे त्या सर्व सदस्यांनी तसेच हनुमान च्या भाविक भक्त जणांनी हनुमानजीचे विधिवत पूजन करून लोकांच्या मनोरंजनासाठी रामचरित्र मानस हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील अनेक भक्तजण व महिला उपस्थित होत्या.