नीरा नरसिंहपुर दिनांक: 7
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
टणु तालुका इंदापूर येथील भर्तरीनाथ ग्रामदैवताच्या प्रांगणात सालाबाद प्रमाणे श्री तुकोबाराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होऊन. गुरुवार दिनांक 6 / 4/ 2023 रोजी सकाळी, संपूर्ण ज्ञानेश्वरी गाथा पारायनाचे पुजन भाविक भक्तांच्या हस्ते करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात झाली.
सप्ताहाची पहिली कीर्तन सेवा संध्याकाळी 8 ते 10 वेळेत श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज मळवली यांची झाली. किर्तन रुपी सेवेमध्ये बापूसाहेब देहुकर बोलत आसताना म्हणाले की आठ दिवस चालणारा अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भाविकांनी नाम चिंतनाचा रस आवडीने घेण्यासाठी यावे. हा आवडीचा भ्रमरस घेतल्यामुळे प्रापंचिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. गुरुवर्य बापूसाहेब देवकर यांचे उद्गार…
भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये टणु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 6 /4 /2023 ते गुरुवार दिनांक 13 /4/ 2023 चालू आसून 24 व्या वर्षाला प्रारंभ झाल्याने सर्वच भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी संपूर्ण आन्नदान सेवा ही टणु ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
ग्राम पंचायत टणु विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हायच चेअरमन व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ टणु यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा करण्यात येत आसतो. असंख्य भाविक भक्त या सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये सामील होत आसतात . गिरवी, ओझरे, संगम, बाभुळगाव, नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी बावडा भांडगाव गारआकोले टाकळी ,टणु , गोंदी, बिजवडी येथील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, तसेच विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, व भाविक हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.