
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या वतीने विशेष साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते,यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना पेट्या वितरित करण्यात आल्या. या सोहळ्यात त्यांनी बांधकाम मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री श्री.प्रकाशजी गेडाम,सहकार आघाडी प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशीषभाऊ पिपरे,यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यासोबत संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.
शासनाच्या मदतीने श्रमिकांना आधार
बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, असे विचार यावेळी माजी खा.अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.