मुख्यमंत्री यांचे द्वारा,शेतकऱ्यांप्रति विविध योजना मार्गदर्शन कार्यक्रम चिमूर तहसील कार्यालयात संपन्न…. — शेतकऱ्यांना आय.डी.प्रमामाणपत्र वाटत…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

          चिमूर तहसील येथे आज मुख्यमंत्री यांचे द्वारा शेतकऱ्यांप्रति विविध प्रकारच्या योजना मार्गदर्शन कार्यक्रम संप्पन्न झालाय…

       तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी शासन आदेश अनुषंगाने,चिमूर मंडळ कार्यक्षेत्रा मधील शेतकरी वर्ग यांना आमंत्रित केले होते.

        तहसीलदार श्रिधर राजमाने आणि अन्य अधिकारी,आणि शेकतरी बांधव सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

        तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध लाभ योजनाचा अहवाल प्रत्यक्ष वाचून दाखवय मार्गदर्शन केले.

        सोबतच शेतकरी आय.डी. प्रमाणपत्र,नूतन आकर फोड,७/१२, फेरफार,हक्क सोडणे,नूतन रेशन कार्ड धारक,यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

      तसेंच शेतकऱ्यांच्या समस्या आणि सूचना मांडण्यास अनुमती देऊन दखल घेतली… 

           १) वडाळा – नेरी हायवे रोड,पासून ते राऊत देव रोड पांधन रस्ता कळमगाव पावेतो,अतिक्रमण काढणे तथा रोडची मापनी,आणि दुरुस्ती शासन द्वारा करणे..

        २)वडाळा रेस्ट हाऊस जुना आय.टी.आय,नेरी रोड हायवे पासून ते चिखलापार रोड कळमगाव मातीकाम खाडिकरण रोड तयार करणे…

       ३) वडाळा पैकू येथील स्मशानभूमीत परिसरातील घनदाट वाढलेली काटेरी वृक्ष तोडून स्वछ करणे आणि सौंदरीकरण करणे…

         ४)शिवधुरा सीमाकांन करणे इत्यादी विषय बद्दल, माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर शिरभय्ये (शेतकरी )वडाळा पैकू,यांनी सदरहू विषय सूचना मांडून अवगत केले.

        तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी सर्व विषय अंमल करण्याचे आश्वासन दिले.

       नायब तहसीलदार पाटील,नायब तहसीलदार पवार,नायब तहसीलदार मोहुर्ले,नायब तहसीलदार वानखेडे,आर.आय.पारसे,तलाठी प्रवीण ठोंबरे,श्री.पाटील,श्री.विनोद गजबे अन्य उपस्थितांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.