
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
भंडारा :- विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकरिता वर्षातून एकदा शाळेतून स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ला उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा येथे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले.
त्याचप्रमाणे आज त्याग मूर्ती रमाई यांची जयंती असून त्यांनी आपल्या परिश्रमातून बाबासाहेबांना घडविले आणि त्याच बाबासाहेबांनी चे संविधान विविध जाती धर्माच्या लोकांना एका सत्र छायेखाली एकत्र आणून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्याचे काम केले.
इतकेच नव्हे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांना उच्च पदावर नेण्याचे काम केलं त्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
परंतु ज्या सावित्रीबाईंनी येथील महिलांना घडविण्याचे काम केले सावित्रीबाईंना या देशातील सरकारने अजून पर्यंत त्यांना भारतरत्न सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले नाही ही फार शोकांतिका असल्याचे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शंकर मानापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कोडापे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , शाळा व्यवस्थापन समितीचेउपाध्यक्ष विकास टेंभुर्णे ,कल्पनाताई जांभुळकर माजी अध्यक्ष ,शेवंता ताई करंजेकर माजी अध्यक्ष ,नितीन वरंटीवार ,राजेश श्रीरामे मुख्याध्यापक,अन्वर पठाण, वसीम पठाण ,, शिल्पा गभने ग्रामपंचायत सदस्य , वसुश्री टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तर्जुले ताई ,माला नगरे, शरद नगरे, सुनीता खोब्रागडे, देवकन्या करंजेकर , जावेद शेख ,व गावातील पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुला मुलींचे नृत्य गीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामरतन मोहुरले यांनी केले. प्रास्ताविक रोशन ईरपाते केंद्रप्रमुख अड्याळ यांनी केले ,आभार हंसराज जांभुळकर यांनी मानले.