उत्तम कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्रामसेवकाचा,”सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून आदरपूर्वक निरोप!

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

    ग्रामपंचायत सावरी बिड.चे ग्रामसेवक महेंद्र मस्के यांनी आधीच चार ग्रामपंचायतचा पदभार असतांना सुद्धा सावरी (बिडकर) ग्रामपंचायतचा कार्यभार आपले उत्तम कर्तव्य समजून अतिशय शांतपणे,सुरळित पार पाडले.

         २ वर्ष ६ महिने ग्रामपंचायत सावरी (बिडकर) चे प्रभारी ग्रामसेवक म्हणून महेंद्र मस्के यांनी स्वतः मेहनत घेत उत्तमपणे कार्यभार पार पाडला.

          चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) ग्रामपंचायतचा पदभार कमी झाल्यानंतर त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला.

           ग्रामसेवक महेंद्र मस्के यांना निरोप देतांना सरपंच लोकनाथ रामटेके,सदस्य रामदास खामनकर,सदस्य दिलीप मोटघरे,सदस्य आषीश‌ घानोडे,ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शेबेकर,सदस्या किरण मेश्राम,सदस्या अर्चना हनवते,ग्रामपंचायत शिपाई दिलीप डांगे,प्रशिक्षणार्थ राजू निवस्कर,ऑपरेटर सुरेश‌ मेश्राम,समाजसेवक बुध्दरत्न शेंडे,आदीं उपस्थित होते.