
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ठेकेदार आणि अभियंत्याचे संबंध जवळचे व सलोख्याचे असतात.यामुळे एकमेकांच्या बाबतीत झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवतात.
असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा हेट्टी (दाबका) येथील निकृष्ट दर्जाच्या सभागृह बांधकामाचा आहे.
सभागृहाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी सभागृहाच्या पायव्यावर आणि स्लाॅबवर १० दिवस पाणी टाकले नाही.
तद्वतच सभागृहाचे बांधकाम करताना आवश्यक साहित्य योग्य प्रमाणात वापरण्यात आले नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.यामुळे सदर सभागृहाचे बांधकाम हे टिकाऊ आणि मजबूत होणार नाही हे वास्तव आहे.
सभागृह बांधकाम ठेकेदारांचे बिले सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय चिमूर येथील संबंधित अभियंत्यानी काढू नये असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची आर्त हाक संबंधितांना आहे.
तद्वतच हेट्टी (दाबका) सभागृहाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे असा कोटगाव गटग्रामपंचायतच्या मासीक सभेत ठराव झाला आहे.
मौजा हेट्टी (दाबका) येथील निकृष्ट दर्जाच्या सभागृह बांधकामाचा प्रश्न हा ऐरणीवर असून संबंधित अभियंत्यानी सभागृह बांधकामांचे बिले काढल्यास,सभागृह बांधकाम संबंधाने निकृष्ट दर्जाचा मुद्दा गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.