जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

      चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

         त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला रोशन बोरकर,काजल ठवरे,सीमा गजभिये,उज्वला गजभिये,शुभांगी मेश्राम,रुपाली रामटेके,सरिता गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. 

         काजल ठवरे यांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या,बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

         या मातेने आपल्या इच्छा – आकांक्षाना मूठमाती देऊन बाबासाहेबांना समाजहीतासाठी लढण्यास प्रोत्साहित केले.माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता,अशा शब्दात मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश मेश्राम यांनी केले.याप्रसंगी भिमज्योती महिला मंडळ,बौध्द पंच कमेटी मालेवाडा तथा गावातील नागरिक उपस्थित होते.