
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
रमाई आंबेडकर संस्था नागपूर द्वारा,”श्रीभुषण रमाई भिमराव आंबेडकर,यांचा 127 वा जयंती सोहळा ९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे.
“आदर्श रमाई” कवि मधुकर गजभिये यांच्या गीत – काव्यासंग्रहाचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 1:30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे स्थळ : अर्पण सभागृह आहे.(विदर्भ हिंदी साहित्य संमेलन,मोर भवन,राणी झाशी चौक,सिताबर्डी,नागपूर.)
कार्यक्रमाचे अध्यक्ष भदन्त नागदिपंकर (महाथेरो) असणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून आद.शुभांगी धोत्रे – वाघचौरे (रमाई आंबेडकर यांची भाची / रमाईचे बंधु शंकर धोत्रे यांची कन्या) आवर्जून उपस्थित असणार आहेत.
तसेच मुख्य अतिथी म्हणून गौतम मोरे (अध्यक्ष, बहुजन धम्ममिशन, मुंबई) हे असणार आहेत.
मुख्य वक्ता म्हणून प्रा. माधुरी गायधनी – दुपटे (फुले, शाहु,आंबेडकरी विचारवंत) या असणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आद. अनिल वासनिक (जेष्ठ पत्रकार / सामाजिक कार्यकर्ते) असणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजकुमार वंजारी (अध्यक्ष, स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था) करणार आहेत तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रगती पारसी करणार आहे.उपस्थितांचे आभार दिलीप तांदळे सर मानणार आहेत.
प्रमुख उपस्थिती मध्ये विजेन्द्र वाघचौरे,मयुर शिर्के,सोनम वाघचौरे,मान्यता पवार,सिमा वाघचौरे,सुषमा वाघचौरे,पौर्णिमा मोरे,वैभव मोरे (मुंबई) हे असणार आहेत.
*****
वृक्षारोपण…
वृक्षारोपण दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:00 वाजता,स्थळ : सम्यक बुद्ध विहार,सरोदे नगर,नागपूर येथे करण्यात येणार आहे.
*****
गरीब महिलांना साडी वाटप..
नागपूर येथील गरिब महिलांना स्त्रिभुषण रमाई आंबेडकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे साड्यांचे वाटप केले जाणार आहे.
****
कार्यक्रमाला सहकार्य करण्याची व उपस्थित राहण्याची विनंती…
स्त्रीभुषण रमाई आंबेडकर संस्था,नागपूर (महाराष्ट्र) द्वारा स्त्रिभुषण रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन ९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
या आयोजित कार्यक्रमाला सर्व स्तरावरील कार्यकर्त्यानी, बंधु-भगिनींनी सहकार्य करावे व कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे कार्यक्रम आयोजकांनी आवाहन केले आहे.
*****
सौजन्य :-
जी.के माने समता सैनिक दल प्रशिक्षण केंद्र,बाबू हरदास एल.एन बहुउद्देशीय संस्था,बौद्ध इतिहास संस्कृती संस्था नागार्जुन संग्रहालय…