
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर(ता.प्र.):- चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव पिपर्डा येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तलाठी शुभम बदकि,कोतवाल प्रदिप पाटिल,यांनी पकडून जप्त केले व जप्तीची कारवाई केली.
ट्रॅक्टर चालक मंगलदास बन्सोड बिना नंबरचा ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करीत होते.
तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगांव येथील तलाठी शुभम बदकि,कोतवाल प्रदिप पाटिल यांनी रेती भरुन असलेल्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली आहे.