ब्रेकींग न्यूज… — वाघाच्या हल्ल्यात गाय,वासरू ठार तर बैल जखमी…  — मासळ येथील घटना…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

    चिमुर तालुक्यातील मासळ बु येथे शेतकऱ्याच्या गोठयात वाघाने हल्ला केल्याने गाय वासरू ठार तर बैल जखमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

     मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला बेघर वस्तीलगत शेतकरी अंतराम रामाजी नन्नावरे यांचा बैलाचा गोठा आहे. त्या गोठ्यात दोन बैल,गाय ,वासरू बांधून होते. रात्रोच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने यात गाय , वासरू ठार तर एक बैल जखमी झाला. घटनास्थळावर वन परिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी, यांच्या मार्गदर्शनात वनपाल अमोल कोवासे यांनी पंचनामा केला असुन घटना परिसारात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी…

     मागील अनेक दिवसा पासून याच परिसरात वाघाने बस्तान मांडले होते. अनेकदा शेतकऱ्याना वाघाचे दर्शन तर पगमार्ग दिसले. परंतु अजून पर्यंत जीवीत हानी झाली नाही. मात्र आज गाय,वासरु तर एक बैल ठार झाल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

          मासळ गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र असून रात्रीच्या वेळीस रुग्णांना उपचार करण्यासाठी जावे लागते. परंतु या परिसरात वाघाचा मुक्तसंचार दिसत असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.