महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भ स्तरीय उपवधू – वर परिचय व समाज मेळावा थाटात संपन्न.. — कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला उत्साहात मेळावा.. — हजारो समाज बांधवांची उपस्थिती. — सांस्कृतिक कार्यक्रमांनी केले मन प्रसन्न.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भ स्तरीय उपवधू – वर परिचय सोहळा व समाज मेळावा नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात थाटात संपन्न झाला.

           या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूभाऊ राऊत होते तर उद्घाटक म्हणून शाम आस्करकर हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश वानखेडे,प्रभाकर फुलबांधे,जेष्ठ मार्गदर्शक,राजेंद्र इंगळे विदर्भ पुर्व अध्यक्ष,सतिश मानकर विदर्भ पश्चिम अध्यक्ष,सौ.हिराताई बोरकर विदर्भ पुर्व महिला अध्यक्ष,श्रीमती सुनीताताई वरणकर विदर्भ पश्चिम अध्यक्ष,गणपतराव चौधरी नागपूर जिल्हा अध्यक्ष,श्रीमती अर्चना कडू नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष,गोपाल कडू उपाध्यक्ष,राजूभाऊ चीचांळकर . वैभव तुरक,प्रफुल्ल अनकर,विष्णू इझनकर,राजेंद्र फुलबांधे,विजय वालूकर,सुरेश अतकरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

         मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भ स्तरीय उपवधू व वर परिचय व समाज मेळावा संपन्न झाला.

          विदर्भ स्तरीय उपवधू व वर परिचय सोहळ्यात नाभिक समाजाच्या ४०० पेक्षा अधिक मुलां-मुलीनी आपला परिचय करून दिला.

         सदर समाज मेळाव्यात संजय भेंडे यांनी जननायक भारत शरत्न स्व.कर्पुरी ठाकूर यांच्या जीवनावर आधारित विषेश मार्गदर्शन केले.

        नागपूर जिल्हा अध्यक्ष गणपतराव चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

        नाभिक समाजाच्या मुलीनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

         कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाभिक समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा स्नेहबंध स्मरणिका पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

         समाजातील उत्कृष्ट व समाज हिताच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा समाज भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

          आज नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाने अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केश शिल्पी महामंडळाची स्थापना करून पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले.

          महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा समाज मेळावा व उपवधू वर परिचय सोहळा ही आजची खरी गरज आहे असे स्पष्ट करून समाजात केश कर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणांना लग्नाकरीता मुली नकार दर्शवितात. 

          त्यांच्या पालकांना आपल्या मुलीसाठी जोडीदार हा नौकरी वालाच हवा.पण स्वताचा मुलगा मात्र शिक्षण घेऊनही केश कर्तनाचा व्यवसाय करतो.पण मुलीसाठी जोडीदार हा नौकरी वालाच पाहिजे,हि मानसिकता व्यवसाय करणाऱ्या तरुणांना साठी मारक ठरत आहे.

       सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजाभाऊ चिंचाळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन अर्चनाताई कडू यांनी मानले.