
रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर..
नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना नगर परिषद दिव्यांगांना मात्र ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.
चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक प्रभागात दिव्यांग असून त्यांचे कडून अर्ज मागविले. परंतु त्यांच्या अर्जा कडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नगर परिषद च्या सामान्य फंडातुन काही टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांगच्या हितासाठी ठेवले जात असते. परंतु नगर परिषद ने डोळे झाक करीत निधी अजूनही वाटप केले नाही. दिव्यांग नगर परिषद कडे सतत जाऊन त्रास सहन करावा लागत आहे.
तरी नगर परिषद ने दिव्यांगाना त्वरित निधी वाटप करण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केली आहे.