मुनघाटे महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

          दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला व व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज्य ,राष्ट्रपिता बापू, मोहन ते महात्मा या गांधीजींच्या जीवन कार्यावरील पुस्तकांवर आधारित गांधी विचार व संस्कार परीक्षा घेण्यात आली होती.

           यात विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे निखिल जयदेव मेश्राम व कु. राखी सुखदेव सयाम हे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम येत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. तर कु. हेमलता संतोष पात्रे ही विद्यार्थीनी जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.

       प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते या तीनही विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

        राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारकार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा , गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ,विद्यार्थ्यांना गांधीचे तत्वज्ञान व जीवनपटाची माहिती व्हावी याकरिता सदर परीक्षेचे आयोजन जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने सातत्याने दरवर्षीच घेण्यात येत असते. दंडकारण्य ही संस्था गांधीजींच्या विचाराची पाईक आहे. यापूर्वीही चंद्रकांत वानखेडे यांचे गांधी का मरत नाही? यावरील व्याख्यान तसेच सुप्रसिद्ध पत्रकार तथा विचारवंत सुरेश द्वादेशीवार यांचे गांधी समजून घेताना,भुजंगराव बोबडे यांचे गांधीजी वरील व्याख्यान असे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जीवन कार्यावरील कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आलेले होते.

         सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ. दशरथ आदे, सहकारी डॉ. गणेश सातपुते, उपप्राचार्य किशोर खोपे, डाॅ. रविंद्र विखार, डॉ. संजय महाजन प्रा. शैलेश हडप, प्रा.सुभाष धोंगडे, प्रा. गणेश डोंगरे यांनी मोलाचे सहकार्य केले.