नरचुली जंगल परीसरात नरभक्षक वाघाने केली गायीची शिकार…. — परीसरात दहशत तर नागरीकामधे भीतीचे वातावरण…  — वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा समस्त नागरिकांची मागणी….    

 प्रितम जनबंधु

     संपादक 

               नरचुली जंगल परीसरात चराई साठी गेलेल्या गायीवर नरभक्षक वाघाने हल्ला करुन गायीची शिकार केली असल्याची घटना सोमवारला ५ फेब्रुवारी रोजी घडल्याची माहीती प्राप्त झाली आहे. गाय चराई साठी गेली पण सदर गाय सायंकाळी कडपासोबत घरी आली नाही. म्हणून गाय मालकाने दुसर्‍या दिवशी जंगल परीसरात गायीचा शोध घेतला असता गायीची वाघाने शिकार केली असल्याचे समजले. सदर गाय ही अखिल सहारे याची असल्याचे समजते.

       वनविभागाने मोका चौकशी पंचनामा करुन सदर गाय मालकास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.

             आरमोरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर निसर्गाच्या सानिध्यात, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या नरचुली येथील गावकऱ्यांना नेहमीच जंगली जनावरांचा हैदोस बघायला मिळतो आहे. गुरे चराई असो अथवा शेतीची कामे असोत जिव मुठीत घेऊनच सगळी कामे करावी लागत असतात.

          काही दिवसांपुर्वी रानटी हत्तीच्या कडपाने नरचुली शेतशिवारात धुमाकुळ माजवून अनेक शेतकऱ्याचे नुकसान केल्याचे दिसुन आले आहे. त्यातुन शेतकरी वर्ग कसाबसा सावरत सुटकेचा स्वास घेत असतानाच आता चराई साठी नेली असलेल्या गायीवर नरभक्षक वाघाने झडप घालून सदर गायीची शिकार केली आहे. त्यामुळेच नागरीकामधे दहशत पसरली असून परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            वनविभाने सदर गंभीर बाब लक्षात घेता नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.