भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालय मध्ये दिनांक 2 फेब्रुवारी ला अरण्य दीप युवा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज आर चव्हाण यांनी भूषविले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. आर पी किरमिरे ,डॉ गणेश चुधरी, प्रा.डॉ. विना जंबेवार, प्रा.डॉ.एच डी लांजेवार, प्रा. डॉ.पंढरी वाघ, प्रा.डॉ.डी बी झाडे, प्रा. डॉ. मुरकुटे सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रियंका पठाडे, प्रा. टी बी धाकडे मंचावरती विराजमान होते.
महाविद्यालयामध्ये दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधी दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन प्रा. डॉ मुरकुटे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांच्या नियोजनात करण्यात आले होते.
दिनांक २ ते ३ फेब्रुवारी दरम्यान अरणदीप युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रियंका पठाडे व महाविद्यालयीन कर्मचारी वृंद यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले.
सदर युवा सांस्कृतिक महोत्सवामध्ये एकल गीत गायन स्पर्धा समूह गीत गायन स्पर्धा फॅशन शो आनंद मेळावा सामूहिक नृत्य स्पर्धा तसेच एकल नृत्य स्पर्धांचे समावेश करण्यात आले.
याप्रसंगी दिनांक 2 फेब्रुवारीला आदिवासी संस्कृती विविध लोकगीत इत्यादी वर आधारित कलाविष्कारचे प्रकटीकरण याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
सदर उद्घाटन पर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विना जम्बेवार यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रियंका पठाडे मॅडम यांनी केले अरण्य दीप युवा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या विकास तसेच विद्यार्थ्यांच्या अंतरंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारे एक महत्त्वपूर्ण मंच होय.
ज्याच्या द्वारा विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील कलाविष्कारांचे प्रकटीकरण होऊन त्यांना चालना मिळते असे उद्गार प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ. गणेश चुधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.महाविद्यालयीन जीवनामध्ये अशा सांस्कृतिक महोत्सवाच्या द्वारा भविष्यातील कलावंतांची निर्मिती होत असते याकरता अशा प्रकारच्या कलाविष्कार ची सदैव गरज आहे. असे उद्गार उद्घाटनिय भाषणातून प्रा डॉ गणेश चुधरी यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रा पुण्यप्रेड्डीवार यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रा.बनसोड, प्रा.वाळके, प्रा.तोंडरे, प्रा.भैसारे, प्रा.डॉ.धवनकर, प्रा.डॉ.गोहने, प्रा.खोब्रागडे, प्रा.धाकडे, प्रा.करमणकर, प्रा.रणदिवे, प्रा.आवारी, प्रा.वटक, प्रा. मांडवगडे ,भास्कर कायते ,श्रीमती सज्जन पवार मॅडम लांबट, गोहने भास्कर वाढणकर राजगडे तथा सर्व प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक वृंद तथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.