दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
वाघाची दहशत म्हटले की अक्षरशः नजरेत मृत्यू दिसणे होय.याचबरोबर वाघ कुठे जाईल व कुठे भेटेल हे सांगता येत नाही.यामुळे नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जगणे सुरु केले असल्याचे सर्व कडील चित्र आहे.नागरिकांचा जीव रुपयांच्या भांडवलात स्वस्त होणार नाही याची दक्षता शासन – प्रशासन गंभीरपणे केव्हा घेणार हे स्पष्ट नाही.
एकीकडे वन्यप्राण्यांचे संरक्षण करतांना शासन-प्रशासनास नागरिकांच्या जिवाची काळजी आहे हे तितकेच खरे आहे.पण सदर काळजी अनेक नागरिकांचे किंवा अनेक पाळीव प्राण्यांचे हिस्त्र प्राण्यांनी जीव घेतल्यानंतरची रुपयांच्या मोबदल्यातील आहे.
मात्र मृत्यू नंतर देण्यात येणाऱ्या रुपयांच्या बाबतीतले नियम किचकट व घातक असल्याने नागरिकांच्या बळी नंतर सुध्दा त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक खर्चासाठी वापर करता येत नाही.
मग प्रश्न पडतो की,हे रुपये शासनाच्या वनविभागाच्या माध्यमातून दिले म्हटल्यासाठी आहेत की ते बॅक खात्यावर जमा झाले म्हणण्यासाठी आहेत हेच कळत नाही.
मागिल अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर,ब्रम्हपूरी,नागभिड,सिंदेवाही,सावली,मूल,भद्रावती व चंद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनेक निष्पाप नागरिक व प्राणी वाघांचे बळी ठरले आहेत.
मात्र,हिंस्र वाघावर सदोदित नियंत्रण ठेवणारी यंत्रणा वनविभागाच्या आवाक्याबाहेर असल्याने ते शांत राहतात हे उघड आहे.बोंबाबोंब झाल्यानंतरच ते बळी घेतलेल्या जागेवर जातात व त्यांच्या नियमानुसार प्रक्रिया पार पाडतात यापलीकडे ते दुसरे काही करु शकत नाही,एवढे स्वस्त मानवप्राणी आता झाले आहेत.