भारतीय जनता पक्षाच्या वतीने दर्यापूरात पत्रकार दिन साजरा… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

          दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरी केल्या जाते. त्याच अनुषंगाने दर्यापूर येथिल भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हा मोर्च्याचे युवा उपाध्यक्ष रोशन कट्यारमल यांनीही पत्रकार दिनानिमित्य दर्यापूर तालुक्यातील पत्रकार मंडळीचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

           यावेळी मंचावर रोशन कट्यारमल, माजी तालुकाध्यक्ष विजय मेंढे, दिपक पारोदे उपस्थित होते. दर्यापूर शहर व ग्रामिण भागातील पत्रकार यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.