दर्यापूर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक 

          दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून दर्यापूर येथिल शासकीय विश्रागृह येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

          दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा सांगळुद ग्रा पं चे उपसरपंच शरद आठवले हे दरवर्षी सामाजिक दायित्वाबरोबर पत्रकार दिनही साजरा करीत असतात. याहीवर्षी शरद आठवले यांनी पत्रकार दिनी दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करीत व भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन साजरा केला.

         यावेळी आयोजक शरद आठवले यांच्यासह जेष्ठ पत्रकार हरिदास खडे,गजानन चौरपगार,युवराज डोंगरे, शिलवंत रायबोले, किरण होले, सुरज देशमुख, रवी नवलकार, अजय वर, आशिष तेलगोटे, राम रघुवंसी, सचिन मानकर, नवेद सय्यद, शांतारक्षक गवई, सुनिल इंगळे, उपस्थित होते.पत्रकारांची बातमीच्या वेळी आठवण करणाऱ्याना मात्र पत्रकार दिनी पत्रकारांचा विसर पडला होता.