
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आळंदी येथे विधानपरिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत महाद्वार चौकात भाजप सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ झाला. विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
भाजपमध्ये सहा वर्षांतून एकदा संघटन पर्व होत असते. या पर्वात केंद्रापासून तर प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होते. देशभरात वर्षभर संघटन पर्व सुरू आहे. राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणाऱ्या आणि जगभरात सर्वांत जास्त प्राथमिक सदस्य असलेला एकमेव भाजप आहे, असेही आ.गोरखे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, डॉ.राम गावडे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सागर भोसले, बंडूनाना काळे, गणेश गरुड, आकाश जोशी, संगिता फपाळ, मंगलताई हुंडारे, वासुदेव तुर्की, भागवत काटकर, आनंद वडगावकर, माऊली बनसोडे, यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.