
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
माझा विजय हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा मेहनतीचा विजय आहे असे मत नवनिर्वाचित आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी सत्कार समारंभाच्या वेळे साले भट्टी येथे मत व्यक्त केले.
धानोरा तालुका भाजपच्या वतीने आमदार नरोटे यांचा 5 जानेवारी रोजी साले भट्टी येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शशिकांत साळवे, मधुकर भांडेकर अमित पोहनकर ज्येष्ठ नेते साईनाथ साळवे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, माजी पंचायत समिती सभापतीअनुसया कोरेटी, माजी पंचायत समिती सभापती अजमन रावते, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चंदू किरंगे, शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष सोपान देव मशाखेत्री, हे व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना नरोटे यांनी तीन वर्षांपूर्वी माझी जिल्ह्यात ओळख कमी होती माझ्यासारख्या नवीन उमेदवाराला पक्षाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला व मला निवडून आणले त्यांचे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच तळागाळातील नागरिकांच्या विकास हेच आपले ध्येय आहे.
सर्व ज्येष्ठ तरुण कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नाने माझा विजय सुकर झाला त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे सत्काराला उत्तर दिले. व्यापारी संघ चांतगाव, धानोरा पत्रकार संघ तसेच ग्रामसभेच्या वतीने आमदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव साजन गुंडावार,भाजपचे शहराध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू,नगरसेवक अनिल मशाखेत्री, सुभाष धाईत, महादेव गणोरकर,बाळू उपस्थित होते.