चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती समितीचे मुख्यमंत्री यांना एसडिओ मार्फत निवेदन…

         रामदास ठुसे

नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी

           चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे यासाठी दिनांक ५ जानेवारी २००२ ला भव्य मोर्चा चिमूर तहसील कार्यालयावर निघाला असता त्या मोर्चाला हिंसक वळण येऊन तहसील जाळपोळ झाली होती. शेकडो कार्यकर्ते जेलबंद झाले होते.

             दिनांक ५ जानेवारी २००३ पासून चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे असे निवेदन चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहे. तीच परंपरा कायम ठेवून निवेदन दिले जात आहे.

               सतत ४१ वर्षा पासून चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची मागणी प्रलंबीत असून सातत्याने मागणी सुरु आहे.

            आज दिनांक ७ जानेवारी २०२५ ला राज्याचे मुख्यमंत्री यांना चिमूर एसडिओ मार्फत निवेदन देण्यात आले असून यावेळी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर, सुनील मैंद,ऍड.महेशदत्त काळे, प्रा.संजय पिठाडे, सौ.लताताई अगडे, बाळू बोबाटे, केशवराव वरखेडे, रमेश करारे, विजय दाभेकर, ऍड.सोनू श्रीरामे, अँड.हिंगे, अरुण लोहकरे,सिंधुबाई रामटेके आदी उपस्थित होते.