
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम बरोबर होत नसल्याच्या तक्रारी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांना मिळाल्यामुळे त्यांनी सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता शहरातील राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेल्या कामाला भेट देऊन पाहणे केली.
तसेच महामार्गाच्या कामातील अनियमितता दूर करून काम चांगल्या दर्जाचे व्हावे असे स्पष्ट निर्देश कंत्राटदाराला दिले आहे.तसेच महामार्गाचे रुंदीकरण करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठे कमी व जास्त ना असं भेदभाव न होता भविष्यातील महामार्ग वरील ट्रॅफिक लक्षात घेता इस्टिमेट नुसार काम करावे असे निर्देश व कामात कसल्याही प्रकारचे हयगय हे खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी धनोरा शहरातील भाजप कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.