ग्रामगीता महाविद्यालयात”सिकल सेल जनजागृती”कार्यशाळेचे आयोजन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 4 जानेवारी, 2025, रोज शनिवारला “सिकल सेल जनजागृती” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

          या कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांची रक्ताची सिकलसेल चाचणी सुद्धा करण्यात आली. कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवेंद्र लिंगोजवार,संस्थापक अध्यक्ष रिसर्च, पुणे व संचालक, आदी टेक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व त्यांचे सहकारी जाकीर शेख उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात पाहुणे म्हणून या कार्यशाळेचे आयोजक व आर.आर. सी. समन्वयक, डॉ.निलेश ठवकर आणि प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे मंचावर उपस्थित होते.

           या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.देवेंद्र लिंगोजवार यांनी देशाच्या भावी पिढीला कशाप्रकारे सिकलसेल ऍनिमिया मुक्त करता येणार हे समजावून सांगितले आणि हे साध्य करण्याकरिता विवाह समुपदेशन यावर भर दिला. जाकीर शेख यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीते मधल्या अभंगातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

           तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांनी सिकलसेल ऍनिमिया थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजनकुमार शील, प्रास्ताविक डॉ.निलेश ठवकर आणि आभार प्रदर्शन डॉ. सुमेध वावरे यांनी केले.या कार्यशाळेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.