श्री.ज्ञानेश्वर विद्यालयात लुई ब्रेल यांची जयंती उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज, आळंदी देवाची येथे संगणक व दिव्यांग विभागाच्या वतीने विविध उपक्रमातून ब्रेल लिपीचे जनक ‘लुई ब्रेल’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या तसेच लुई ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

            कार्यक्रमाच्या निमित्ताने समीक्षा कसबेकर, सारथी शिंदे, भाग्यश्री भिकनुरे या दिव्यांग विद्यार्थिनींनी आपले मनोगतातून लुई ब्रेल यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. नयना वाघ हिने कवितेतून अभिवादन केले.   

             कार्यक्रमाचे औचित्य साधून संगणक विभागातर्फे लुई ब्रेल जयंती निमित्त दिव्यांग मुलींना श्रीकांत मिनिटा हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. यासाठी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, संगणक विभाग प्रमुख सोमनाथ आल्हाट, प्रकाश भागवत, अमीर शेख व मोनिका जगताप यांचे सहकार्य लाभले.

              संगणक विभागाच्या उपप्रमुख स्वागती कदम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवले. या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग विभागाच्या अध्यापिका सुनिता गिरी, मिनाक्षी काकडे, दिपाली रासकर व जयवंत खुंटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग विद्यार्थीनी कोमल चव्हाण हिने केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.