
“आजपर्यंत शहिद नरेंद्र दाभोळकर , शहीद कलबुर्गी, शहीद गोविंद पानसरे, शहीद, शहीद गौरी लंकेश यांची झालेली हत्या म्हणजे RSS / मनुवादी यांची विचारधारा वैचारिक सामन्याचे आव्हान पेलू शकत नाही. हे सिद्ध झाले. म्हणून षंढ, नपुसंकत्वाचे जागतिक विश्वरत्न पुरस्काराचे हे प्रथम मानकरी ठरतील……..!”
आणि आता हे रक्तरंजित लोण जागृतीच्या मैदानातून हळू हळू राजकीय क्षेत्राकडे सरकत आहे हे शहीद संतोष देशमुख यांच्या हत्येवरून जाणवत आहे.
“जोपर्यंत या देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अस्तित्वात असेल, तोपर्यंतच राजकीय लोकशाही दिसेल.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बीडची घटना वरील बाबासाहेबांचा इशारा खरा ठरत असल्याचे सांगून जाते.
कारण………
सामाजिक समानता प्रस्थापित होऊ न देण्यासाठी RSS / मनुवाद्यांनी अर्थात संविधानविरोधी शक्तीने प्रथम धार्मिक तेढ निर्माण करुन समाजा – समाजात कलह निर्माण केला. त्यासाठी एकमेकांत केवळ मतभेदच निर्माण करुन थांबले नाहीत तर त्यांच्यात ते एकमेकांसमोर रक्ताचे पाट वाहण्यासाठी कसे पुढे येतील इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. त्यातील ताजे उदाहरण नांदेड मधील शहीद अक्षय शिंदे यांची हत्या, परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या हे प्रकरण आहेत.
अशी सामाजिक विषमता निर्माण करण्याचे अती उच्चं टोक गाठल्यानंतर याच संविधान विरोधी शक्तीने आर्थिक विषमता पेरण्याचे काम सुरुवातीपासून केले. यामध्ये, कर्ज न काढता देशाने व राज्य सरकारांनी राज्यकारभार कसा करावा. या संविधानिक मार्गदर्शक तत्वाना पायदळी तुडविले. CAG कॅग सारख्या संस्थेचे पंख छाटण्याचे काम यांनी केले. सरकारी तिजोरीतील पैश्याची विल्हेवाट भ्रष्टाचाराच्या पाइपातून वाहून नेली. परिणामी जगाचा पोशिंदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर चढला. आणि जी जनता जिवंत आहे ती जगता – जगता मरत आहे आणि मरता – मरता जगत आहे. हे भयान वास्तव या संविधानविरोधी शक्तीने गेल्या 75 वर्षात निर्माण केले…….!
परिणामी आर्थिक विषमता निर्माण झाली…..!
आता सामाजिक आणि आर्थिक लोकशाही संपल्यानंतर राजकीय लोकशाही संपन्यास सुरुवात झाली ती म्हणजे बिडच्या शहीद संतोष देशमुख यांच्या हत्येने………..
‘देशातील कोणताही सरपंच हा संविधानिक पदाचा तो त्या गावचा प्रधानमंत्री असतो. त्या गावचा प्रथम नागरिक असतो.”
अशा सरपंचाची हत्या येथील उन्मत झालेल्या राजकीय नेत्याच्या, मंत्र्याच्या वरदहस्तामुळे झाली असेल………
आणि त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी येथील EVM मुख्यमंत्री फसनवीस यांना अर्थात गृहमंत्री यांना जर CID कडे प्रकरण सोपवण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागत असेल, त्या CID ला सुद्धा ते अपयश येऊन स्वतः गुन्हेगार CID ला शरण येत असेल……..
बीडचा बिहार झाला का नाही……..?
आणि ही सरपंचाची हत्या म्हणजे राजकीय लोकशाही संपन्याची सुरुवात झालेली आहे…..!
याला जबाबदार कोण…..?
याला जबाबदार आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही संविधानाची शक्ती नागरिकांना जागृत करुन येथील राजकारण्यांचे मनसूबे दाखवून वेळीच त्यांना रोखू शकलो असतो, तर ही वेळच आली नसती.
अजूनही वेळ गेलेली नाही. निदान आता तरी आपल्या साडी, माडी आणि गाडीच्या स्वार्थी, षंड आणि नपूंसक घोष्यातून बाहेर येऊन तथागत भगवान बुद्धाच्या धम्मक्रांतीला आणि बाबासाहेबांच्या संविधान क्रांतीला समजून घेऊन किनारा नसलेले जागृतीचे वर्तुळ निर्माण करुन आपापल्या मायबापाचे ऋण फेडूया….
तेंव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही भारतीय नागरिक ठरू शकतो. त्यासाठी या EVM ला देशातून हद्दपार करूया आणि लगेच सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापन करण्यासाठी एकीने काम करूया……….
अन्यथा रक्तरंजित फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीचे स्वागत करण्यासाठी तयार रहा……!!!”
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689