बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील मारुती मंदिर या ठिकाणी लक्ष्मण शक्ती सोहळा अनेक वाचक, सुचक व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लक्ष्मण शक्ती सोहळ्या आगोदर 14 दिवस वनवास करण्यासाठी अनेक ठिकाणची तीर्थ, रामेश्वरचे 22 कुंड स्नान, कन्याकुमारी येथील तीन समुद्र संगमांचे दर्शन, गोकर्ण महाबळेश्वर रावणाने कैलासवर आणलेल्या आत्मलिंगाचे दर्शन, कोल्हापूरची अंबाबाई मातेचे दर्शन, या सर्वच ठिकाणी दर्शनाचा लाभ व आनंद घेतल्यानंतर पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी लक्ष्मण शक्ती सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे तिसऱ्यांदा लक्ष्मण शक्ती सोहळा आसुन ग्रंथ वाचक सूचक भाविक भक्त महिला भगिनी व श्रोते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मण शक्ती दिवशी मारुती मंदिरामध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजे पर्यंत रात्रभर ग्रंथाचे वाचन करून सकाळी पहाटे लक्ष्मण शक्ती सोहळा तोफा व फटाक्यांच्या आवाजात साजरा करण्यात आला.
सर्वांच्या उपस्थित महारती करून सर्व राम भक्त व भाविक श्रोते यांना महाप्रसाद देण्यात आला. पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गारअकोले, टाकळी, टणु , गिरवी, ओझरे , गोंदी ,सह सर्व वेगवेगळ्या भागातून आलेले वाचक सूचक व श्रोते शेकडो संख्येने उपस्थित होते.
प्रमुख वाचक व सुचक म्हणून,, गारआकुल्याचे ह भ प भोसले आबा, संदिपान पडळकर, बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, महादेव सुतार, अरुण सूर्यवंशी, आर्जुन पडळकर, महेश सुतार, डॉ.शंकर बोडके, सोमनाथ सुतार, नागनाथ बिचकुले, ज्ञानेश बिचकुले,आधी भाविकांनी वाचन केले.
गेली पाच महिन्यापासून नित्यनेमाने मंदिरांमध्ये वाचक व सुचक म्हणून सर्व जबाबदारी या भाविकांनी व श्रोते यांनी पार पाडली. याबद्दलही सर्व भाविकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
चौकट
लक्ष्मण शक्ती सोहळ्याच्या महाप्रसादाचे आयोजन माजी विद्यमान सरपंच, तथा संचालक श्रीकांत बोडके, सुभाष बोडके, महादेव मगर यांच्या वतीने करण्यात आले.
शेवटी महाप्रसाद घेऊन लक्ष्मण शक्ती सोहळ्याची सांगता झाली.