प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने गरिबांना ब्लँकेट्स वाटून “पत्रकार दिन” साजरा…

प्रितम जनबंधु

    संपादक 

 लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कडक अशा थंडीच्या दिवसात मायेची ऊब लागावी या दृष्टिकोनातून रस्त्यावर व मंदिरासमोर बसणाऱ्या १०१ गरिबांना उबदार ब्लॅंकेट्सचे वाटप करून पत्रकार भवन लातूर येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

              प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

                  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झेरिगुंठे, राज्य महिला अध्यक्ष सुधाताई कांबळे जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, अशोक देडे नरसिंह घोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

            आपल्या मनोगतात लहूकुमार शिंदे म्हणाले की पत्रकार संघटना कोणतीही असली तरी पत्रकारांची जात एकच आहे आणि त्यासाठी एक रहो नेक रहोचा नारा दिला तर नरसिंह घोणे यांनी पत्रकार दिन हा पत्रकारांचा पोळाच आहे असे सांगितले. 

       सुधाताई कांबळे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन पत्रकारांनी कोणत्याही प्रश्नासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले.

                अशोक देडे यांनी अनेक पत्रकारांच्या संघटना एकत्र येऊन हा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. 

                यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते अतिशय थंडीच्या दिवसात मायेची ऊब लागावी म्हणून रस्त्यालगत व मंदिरासमोर बसणाऱ्या १०१ गरिबांना उबदार ब्लॅंकेटस् चे वाटप करण्यात आले. त्यानंतर माहिती कार्यालय येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 

              याप्रसंगी उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, चंद्रकांत झेरीगुंठे, राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजूळे, नरसिंह घोणे , रघुनाथ बनसोडे, अशोक देडे, महादेव पोलदासे, महादेव कुंभार, वामन पाठक, पंडित हनमंते, शिवाजी कांबळे, संतोष सोनवणे, शिरीषकुमार शेरखाने, अशोक हनवते, महादेव डोंबे, के वाय पटवेकर, रामकृष्ण बैले, कावेरी विभुते, दिगंबर तारे, मुरली चेंगटे, काकासाहेब घुटे, साईनाथ घोणे खंडेराव देडे, संजय उदारे, दीपक गंगणे, नितीन चाळक, राजाभाऊ जाधव, अमोल घायाळ, लिंबराज पन्हाळकर आदीसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

              कार्यक्रमाचे आभार शिवाजी कांबळे यांनी केले.