धानोरा /भाविकदास करमनकर
आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने काल दिनांक 6 जानेवारी 2022रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना वर रुग्णालयातील हेल्थकेअर जिल्हा परिषद हायस्कूल मोहलि येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश गजबे ,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर देवेंद्र सावसाकडे, डॉक्टर अजित लाखानी, डॉक्टर सीमा गेडाम, डॉक्टर मंजुषा लेपसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर कुरेशी, दिवाकर भोयर, भाविकदास करमनकर , शरीफ कुरेशी ,ओम देशमुख , बंडू हरणे, सिताराम बडोदे ,देवराव कुंघाटकर, श्रावण देशपांडे ,अरून चापडे आणि मारोती भैसारे उपस्थित होते.