डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप, प्रबुद्ध भारत विचारमंचचे आयोजन… 

युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक

            विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य प्रबुद्ध भारत विचारमंच, दर्यापूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप दर्यापूर येथिल बस स्थानक चौकात करण्यात आले.

            सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करुन आदरांजली वाहन्यात आली. 

          प्रबुद्ध भारत विचारमंचचे हरिदास खडे, शरद आठवले(उपसरपंच)ग्रा पं सांगळूद, दिलीप गवई गजानन चौरपगार, रुपेश मोरे, रोशन कट्यारमल,अनिल गवई ,बंटी आठवले, राजेश वाकोडे, तलाठी विश्वनाथ गोंडाने, युवराज डोंगरे,सुरेश चौरपगार,दिपक बागडे, शांतरक्षक गवई सुरेश भटकर, शिलवंत रायबोलें, अजय वर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.